उक्कलगावमध्ये दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात एकजण गंभीर जखमी; खासदार लोखंडेंनी केली जखमींना मदत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील उक्कलगावकडून कोल्हारच्या दिशेने चाललेल्या भरधाव बुलेट दुचाकीने कोल्हारकडून येणार्‍या डिस्कव्हर दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी (ता.6) घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, एकलहरे (आठवाडी) येथील धर्मेंद्र शिंदे यांचा मुलगा व सून संगमनेरकडे बहिणीला भेटण्यासाठी चालले होते. दरम्यान समोरून कोल्हारच्या दिशेने विजय बाबुराव उपाध्ये (रा.सात्रळ-सोनगाव) हे आपली पत्नी व दोन मुलांसह बेलापूर येथे लग्न समारंभासाठी येत होते. दरम्यान दोन्ही दुचाकी परस्परविरोधी दिशेने उक्कलगावातील फर्‍याबागनजीक आल्या असता त्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर विजय उपाध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.

सदर अपघात झाला त्यावेळी खासदार सदाशिव लोखंडे काही कामानिमित्त संगमनेरला चालले होते. त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींची विचारपूस केली व रुग्णवाहिका मिळत नसल्याने स्वत:ची गाडी जखमींना दवाखान्यात जाण्यासाठी दिली. तोपर्यंत ते उक्कलगावमध्ये थांबून राहिले. घटना समजताच घटनास्थळी उक्कलगावच्या नागरिकांनी देखील तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

Visits: 138 Today: 2 Total: 2062740

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *