संगमनेर तालुक्यात आजही शंभरावर रुग्ण! पठारभागासह ग्रामीणभागातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या दररोजच्या रुग्णसंख्येत सुरु असलेला चढ-उतार आजही कायम आहे, मात्र संगमनेर तालुक्यात चढाला लागलेली रुग्णसंख्या अजूनही खाली येण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संगमनेरची सरासरी रुग्णगती सर्वाधीक असून तालुक्यातून रोज 119 रुग्ण समोर येत आहेत. या कडीत आजही शहरातील तिघांसह 123 रुग्णांची भर पडली आहे. आजच्या अहवालातून तालुक्याच्या पठारभागातील संक्रमणात पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 26 हजार 230 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला काहीअंशी ब्रेक लागून सर्वाधीक प्रादुर्भाव असलेल्या तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचा दिलास दिसत असतांना संगमनेरसह काही तालुक्यातील रुग्णगती मात्र खाली येत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा आणि त्यातून होणारे गर्दीचे समारंभ आणि नियमांकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता यामुळे जिल्ह्यातील परतलेले संक्रमण माघारी येवून त्याने संगमनेरसह काही तालुक्यांमध्ये पुन्हा भितीदायक वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती सध्या संगमनेर तालुक्यात दिसत असून मागील पंधरवड्यात तालुक्याच्या पठारभागातील फुगलेली रुग्णसंख्या ओसरत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतांना आज तेथील सोळा गावांतून 46 रुग्णसमोर आले आहेत. विशेष म्हणजे बोटा, वरवंडी व साकूर या तिन गावांमधूनच आज 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज प्राप्त झालेल्या एकूण 123 जणांच्या अहवालांत शहरातील नऊ जणांचा समावेश असून त्यात देवाचा मळा येथील 58 वर्षीय इसम, गणेशनगर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनता नगर येथील 20 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 44 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता असलेल्या 49 वर्षीय इसमासह 36 व 25 वर्षीय तरुण व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. याशिवाय पठारभागातील जांभुळवाडी येथील 60 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 28 वर्षीय तरुण, मांडवे बु. येथील 50 वर्षीय इसमासह 31 वर्षीय महिला, साकूर येथील 55 व 50 वर्षीय इसमांसह 38, 33 व 23 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, बोटा येथील 55, 29 व 25 वर्षीय महिला, 42 वर्षीय इसम, 16 व 15 वर्षीय मुले, 11 व नऊ वर्षीय मुली,
घारगाव येथील 40 वर्षीय तरुण, पोखरी बाळेश्वर येथील 60 वर्षीय महिला, म्हसवंडी येथील 65 वर्षीय महिला, वरवंडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 वर्षीय इसम, 42 व 35 वर्षीय तरुण, 38 वर्षीय महिला, 15 व 14 वर्षीय मुले व सहा वर्षीय मुली, आंबी खालसा येथील 40 व 36 वर्षीय तरुण, नांदूर येथील 75 व 55 वर्षीय महिला, कोठे बु. येथील 46 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुणी व 17 वर्षीय तरुण, भोजदरी येथील 21 वर्षीय तरुण, दरेवाडीतील 50 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण व 26 वर्षीय महिला, रणखांब येथील 23 वर्षीय तरुण आणि कुरकुटवाडीतील 62 वर्षीय महिलेसह 32 व 22 वर्षीय तरुण, तसेच तालुक्यातील अन्य गावांतील सादतपूर येथील 16 वर्षीय मुलगा, शेडगाव येथील 45 वर्षीय इसम, पिंपरी येथील 55 वर्षीय महिला,
पानोडीतील 74 वर्षीय महिला, दाढ बु. येथील 25 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 32 वर्षीय महिला, अंभोरे येथील 28 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण व 10 वर्षीय मुलगी, प्रतापपूर येथील 42 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 55 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 50 वर्षीय महिला, वडगाव येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खळी येथील 50 वर्षीय इसम, माळेगाव हवेलीतील 66 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, राजापूर येथील 51 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 46 वर्षीय इसम, पेमगिरीतील 55 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55, 31 व 30 वर्षीय दोन महिला, 35 वर्षीय तरुण, 11 व पाच वर्षीय मुलींसह सात वर्षीय मुलगा,
धांदरफळ येथील 36 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 60 वर्षीय महिला, कणकापूर येथील 54 वर्षीय इसम, डिग्रस येथील 50 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालक, पारेगाव खुर्द येथील 35 व 21 वर्षीय तरुण, मनोली येथील 13 वर्षीय मुलगा, सायखिंडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 वर्षीय इसम व 34 वर्षीय महिला, कासारवाडीतील 40 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पावसा येथील 54 वर्षीय महिला, 51 वर्षीय इसम व 10 वर्षीय मुलगा, आश्वी बु. येथील 60, 54 व 30 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 70 व 23 वर्षीय महिला, बारा वर्षीय मुलगी व सहा वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, 40, 36, 33 व 32 वर्षीय तरुण, 65 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा व सहा वर्षीय मुलगी. तसेच अन्य तालुक्यातील डोंगरगाव येथील 33 वर्षीय तरुण, पोहेगाव येथील 44 वर्षीय इसम व देसावडे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचाही त्यात समावेश आहे.