बेलदार समाज संघाच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी चव्हाण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यानंतरही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त असणार्या बेलदार समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढण्यार्या बेलदार भटका समाज संघाची संगमनेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुकाध्यक्षपदी दत्ता चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

सदर नूतन कार्यकारिणीमध्ये संघटकपदी रवींद्र जाधव, उपाध्यक्षपदी संजय पवार, कार्याध्यक्षपदी विकास मोहिते, खजिनदारपदी राजू मोहिते, सचिवपदी सुनील वाकचौरे, प्रसिध्दीप्रमुखपदी चंद्रशेखर काशिद यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्य समितीच्यावतीने सुखदेव मोहिते, हिंमत मोहिते, जिल्हा सोमनाथ चव्हाण, अर्जुन चव्हाण, नवनाथ बबन पवार, ज्ञानेश्वर मोहिते, नारायण मोहिते, बाळू मोहिते यांची जिल्हा कार्यकारिणीसाठी नावे सूचित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीने समाजबांधवांच्या समस्या एकजुटीने सोडविण्याचा निर्धार व्यक्त करुन कोणाच्या अडी-अडचणी असल्यास संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

