सर्वोदय पतसंस्थेने दीडशे कोटी ठेवींचा टप्पा केला पार
सर्वोदय पतसंस्थेने दीडशे कोटी ठेवींचा टप्पा केला पार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील सर्वोदय पतसंस्थेने आपल्या दीडशे कोटी ठेवींचा टप्पा नुकताच पार केला आहे. विजयादशमीला संस्थेने चाळीसाव्या वर्षात पदार्पण केले असून आजमितीस संस्थेकडे दीडशे कोटी ठेवी असून 108 कोटींचे कर्ज वाटप केलेलं आहे. तर 48 कोटींचा स्वनिधी, 86 कोटींची गुंतवणूक आणि शून्य टक्के एनपीए असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र ओहरा यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष ओहरा म्हणाले, दीपावलीपूर्वीच सभासदांना 15 टक्के दराने लाभांश वाटप आणि पाचशे रुपयांचे सवलत कुपन देण्यात येणार आहे. तर कर्मचार्यांना 25 टक्के बोनस वाटप केला आहे. संस्थेच्या ठेवींचे व्याजदर जास्त असून कर्जाचे व्याजदरही कमी आहेत. संस्था योग्य दरात ठेवी स्वीकारुन वाजवी दरात कर्ज उपलब्ध करुन देते. सोनेतारणास आठ टक्के दरापासून कर्ज उपलब्ध असून संगमनेर तालुका व परिसरातील ग्राहक सोनेतारणासाठी विश्वसनीय पतसंस्था म्हणून सर्वोदय पतसंस्थेकडे सातत्याने व्यवहार करत असल्याचे सांगितले. तर संस्थेची अशीच घोडदौड यापुढेही कायम राहील असा विश्वास उपाध्यक्ष महेश कटारिया यांनी व्यक्त केला. संस्थेच्या विकासात संचालक वैभव शाह, कल्पेश मेहता, सचिन शाह, सचिन येवंतीलाल शाह, सुरेश शाह, दर्शन मेहता, सुभाष शाह, शरद ओहरा, संकेत शाह, अरुण नारायणे, नितीन भागवत, राजेंद्र काळे, राजेश दोशी, आशिष शाह, श्वेता मेहता, राखी शाह यांसह व्यवस्थापक मधुकर वनम, सहाय्यक व्यवस्थापक राजेश ढगे व कर्मचार्यांचे सहकार्य असते.