श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान उत्साहात साजरे  

नायक वृत्तसेवा, संगमनेर :

शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर आणि विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ ज्योती मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षण, आत्मविश्वास व कायदेशीर जागरूकता निर्माण करणे हे होते.

प्रमुख व्याख्यात्या ॲड. ज्योती मालपाणी  यांनी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध कायदे, अधिकार आणि आत्मसुरक्षेचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले. दुसऱ्या सत्रात कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक श्री. दत्ता भांदुर्गे यांनी दिले. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सराव सत्रात उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय मणियार होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी  विकास अधिकारी प्रा. बालाजी नरवटे यांनी केले. सूत्रसंचालन  रचना खा व सुमेधा अभंग यांनी केले, तर आभार अस्मिता देशमुख व स्नेहल जाधव यांनी मानले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक सचिन वालझाडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘निर्भय कन्या अभियान’च्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि सशक्ततेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

Visits: 68 Today: 3 Total: 1107052

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *