शिक्षकाची बदली करा अन्यथा शाळेला टाळे ठोकणार! मडकी येथील शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील मडकी येथील जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी केली. मागणी मान्य न झाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

बद्रीनाथ चव्हाण असे या शिक्षकाचे नाव असून ते शाळेत सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लबडे यांच्या नेतृत्वाखाली मडकी येथील ग्रामस्थांनी शनिवारी नेवाशाचे गटविकास अधिकारी शेखर शेलार व गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सदर तक्ररीत, मडकी येथील जिल्हा परिषद शाळेत सेवेत असले शिक्षक चव्हाण हे कायम अनुपस्थित रहात असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

याबाबत शिक्षण विभागाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील कुठलीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या शाळा समिती व ग्रामस्थांनी या शिक्षकाची तत्काळ बदली करावी. अन्यथा सर्व ग्रामस्थ व पालक समितीच्यावतीने शाळेला टाळे ठोकणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर ज्ञानेश्वर लबडे, काकासाहेब लबडे, किशोर लबडे, देविदास सोनवणे, सुनील लबडे, शेखर लबडे, पोपट लबडे, अरुण बिडगर यांच्या सह्या आहेत.

मडकी येथील एका शिक्षकाविषयी शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांची तक्रार आली आहे. सदर शाळेवर दोन दिवसांत पर्यायी शिक्षक नेमणूक करण्यात येईल.
– सुलोचना पटारे (गटशिक्षणाधिकारी-नेवासा)

Visits: 206 Today: 1 Total: 1961618

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *