पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके

नायक वृत्तसेवा, शेवगाव
पैगंबरांच्या आदर्श जीवनमूल्यांचा प्रसार व विद्यार्थ्यांमध्ये नैतिकतेची बीजे रुजवण्याचा उद्देश बाळगून जमातूल खैर फाउंडेशन, शेवगाव यांच्यातर्फे ‘पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

बंधन लॉन्स, गेवराई रोड, शेवगाव येथे आयोजित या कार्यक्रमालत शेवगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, पैठण, कर्जत, पाथर्डी, सोनई, कुकाणा, सलाबतपूर, खोसपुरी, नगर शहर, कोपरगाव अशा दहापेक्षा अधिक तालुक्यांमधून सुमारे दहा हजार विद्यार्थी व माता-भगिनी सहभागी झाल्या होत्या.अध्यक्षस्थानी मौलाना मोहम्मद रियाज होते. स्पर्धेत विजयी ठरलेल्या सर्वांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच विविध भागांतील आयोजनकर्त्यांचा
विशेष सन्मानचिन्हांनी गौरव करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी तय्यबभाई पटेल म्हणाले, की स्पर्धेचा मुख्य हेतू पैगंबरांच्या शिकवणीचा प्रसार, विद्यार्थ्यांना सदाचाराच्या मार्गावर नेणे आणि चांगल्या नैतिक जीवनाची प्रेरणा देणे हा आहे. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून पुढील काळात ही मोहिम संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्याचा आमचा संकल्प आहे.

कार्यक्रमासाठी मौलाना अंजुम, इमाम कुबा मस्जिद शोएब सय्यद, अझर कुरेशी, बाबा तांबोळी, इरफान मुजावर, वसीम पठाण, जाकीर मन्सुरी, समीर मेंबर, हाजी शाहरुख अतार, मुदस्सीर, हाफिज सोहेल आव्हाना, हाफिज फिरोज, हाफिज तकी, फयाज जहागीरदार, मोहसिन सुभान शेख, मुफ्ती रशीद बोधेगाव, मौलाना रईस आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 83 Today: 3 Total: 1103668
