आमदारांनी बसचे श्रेय लाटण्याचा  प्रयत्न करु नये : त्रिभुवन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर 
 गेले सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर ६ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे गेले सहा महिन्यापासून सर्वपक्षीय आंदोलनांचा पाठपुरावा असून, हे यश आंदोलनकर्त्यांचं आहे. मात्र, ही बस सुरू होण्याचे श्रेय आ. हेमंत ओगले यांनी घ्यायचा केलेला प्रयत्न ‘फुकटचा आणि केविलवाणा’ असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे.
 श्रीरामपूर-मुंबई बस गेले सहा वर्षे बंद होती.ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही सातत्याने आंदोलने,निवेदने आणि पाठपुरावा केला.शेवटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत पंधरा दिवसापूर्वी लेखी आश्वासन दिलं आणि बस सुरू झाली. बस सुरू करण्यात आ. हेमंत ओगले यांचा कोणताही सहभाग नव्हता.साधे दोन ओळीचे पत्र देखील त्यांनी दिले नाही परंतु गाडी सुरू होणार हे कळताच आ. ओगले आणि त्यांचे काही कार्यकर्ते अचानक प्रकट झाले आणि नारळ फोडून फोटोसेशन करून निघून गेले.
त्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतःव्हॉट्सअ‍ॅपवर, ही बस त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याचे खोटे संदेश पसरवण्यात आले. ही जनतेची दिशाभूल करणारे असून अशा खोट्या श्रेय लाटण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.त्यांना श्रेय घ्यायच असेल तर रोज सकाळी आठ वाजता श्रीरामपूर -मुंबई बस चालू होती ती बस कोरोना काळापासून बंद केली आहे.
ती गाडी पुन्हा सुरू करून दाखवावे आणि त्याचे श्रेय बिंधास आ.ओगलेनी घ्यावे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू असेही त्रिभुवन यांनी स्पष्ट केले आहे.
Visits: 134 Today: 1 Total: 1789137

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *