‘समर्पित क्षितिजं’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

नायक वृत्तसेवा, अकोले
यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित व राजेंद्र भाग्यवंत लिखित ‘समर्पित क्षितिजं’ या पुस्तकाचे अकोले येथील महाविद्यालयात रविवार दि. १२ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संवादलेखक तसेच ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यकमातील पत्रांचे लेखन करणारे लेखक अरविंद जगताप, पद्मश्री राहीबाई पोपेरे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

राजेंद्र भाग्यवंत यांनी या अगोदर ‘मी गुरुजी झालो त्याची गोष्ट’ हे पुस्तक शिक्षणावर लिहीले होते. त्या पुस्तकाला महाराष्ट्रभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाची दखल अनेकांनी घेऊन त्या पुस्तकाला डझनभर पुरस्कार मिळाले. या यशानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित होत आहे.

‘समर्पित क्षितिजं’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला गिरजाजी जाधव, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख, प्राचार्य भास्कर शेळके, प्रकाश टाकळकर, जितीन साठे तुकाराम धांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच शिक्षक, पत्रकार व इतर क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त प्रथमच अकोलेकरांना अरविंद जगताप यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Visits: 26 Today: 1 Total: 1104806
