‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबाबत मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबाबत मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठा आरक्षणाबाबत एका वृत्तवाहिनीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करुन मराठा समाजाच्या भावना दुखाविल्या आहेत. याबाबत आज (शुक्रवार ता.9) संगमनेरातील सकल मराठा समाजाच्यावतीने शहर पोलीस पोलीस निरीक्षक अभय परमार यांना निवेदन दिले आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत अनेकदा आंदोलने, मोर्चे निघाले आहेत. तरी देखील अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. सध्या हा प्रश्न चर्चेत असून, वंचितचे अ‍ॅड.आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण होईल या इराद्याने खासदार संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्याविषयी प्रक्षोभक विधाने केली. या प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा, या मागणीबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने शहर पोलिसांना शरद थोरात, राजेश देशमुख, अमोल खताळ, अमोल कवडे, अविनाश सातपुते, अण्णा शेलकर, प्रशांत वामन, अविनाश थोरात, किरण घोटेकर, विवेक बोर्‍हाडे, दिनेश फटांगरे, निर्मला गुंजाळ, नीलिमा घाडगे, राजू सातपुते, अशोक सातपुते, व्यंकटेश देशमुख, सौरभ देशमुख, अभिषेक थोरात, नारायण खुळे, शोन थोरात, अविनाश साबळे, सुशांत पावसे, सिद्धेश घाडगे, अजिंक्य डोंगरे, प्रवीण एरंडे, अभिषेक गुंजाळ, शुभम काशिद आदिंनी निवेदन दिले.

Visits: 182 Today: 1 Total: 2166184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *