कर्जुले पठार येथे वीजेचा धक्का बसून यंत्र चालकाचा मृत्यू

कर्जुले पठार येथे वीजेचा धक्का बसून यंत्र चालकाचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील कर्जुले पठार येथील वीज उपकेंद्रामध्ये वीजवाहक तारेचा जोराचा धक्का बसून यंत्र चालकाचा (ऑपरेटरचा) जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना सोमवारी (ता.21) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.


सोपान भावका कुलाळ (वय 29, रा.टाकेवाडी, जवळे बाळेश्वर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की. कर्जुले पठार येथील वीज उपकेंद्रामध्ये यंत्र चालक (ऑपरेटर) म्हणून सोपान कुलाळ हे काम करत होते. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कुलाळ हे उपकेंद्रामध्ये काम करत असताना त्यांना वीजवाहक तारेचा जोराचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर मयत कुलाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी घारगाव वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता आशिष रणदिवे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करत आहेत. दरम्यान, कुलाळ यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Visits: 97 Today: 2 Total: 1103255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *