कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी प्रभावी साधन : प्राचार्य वडितके

नायक वृत्तसेवा, आश्वी
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी साधन आहे. याचा योग्य वापर केल्यास शिक्षण अधिक प्रभावी, सुलभ आणि मनोरंजक बनू शकते. ए आय चा वापर करून विद्यार्थी अभ्यासाची तयारी लवकर व प्रभावीपणे करू शकतात असे प्रतिपादन आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.

रय़त शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता लँबच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य देवराम वडितके बोलत होते.यावेळी सुभाष म्हसे,सुमतीलाल गांधी,सिताराम चांडे,अनिल मंन्तोडे,वैभव ताजणे, पर्यवेक्षक दिपक चव्हाण,विभाग प्रमुख बी.एम. सहाणे, रमेश थेटे,मोहन घिगे,उषा घिगे,मुन्तोडे,पाटील यासह विद्यार्थी, पालक,शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाबरोबरच विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंग या विषयावर शिक्षण देण्यात येत असुन काळाबरोबर ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी पुढे जाणे आवश्यक असल्याचे मत पर्य़वेक्षक दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन सुवर्णा वाकचौरे यांनी तर आभार बागुल यांनी मानले.

थ्रीडी प्रिंटिंग ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे, जी संगणकाद्वारे डिझाइन केलेल्या त्रिमितीय थ्रीडी वस्तूंना प्रत्यक्ष रूपात छपाई करून तयार करण्यासाठी वापरली जाते. याचा वापर करून उत्पादनात अचूकता आणि सुसूत्रता येते तसेच वेळ व खर्चात बचत होते.तसेच यामुळे सर्जनशीलता आणि वैयक्तिक डिझाईनची मुभा मिळते व याचा वापर लघुउत्पादनासाठी उत्तम पर्याय असल्याचे
बी.एम. सहाणे यांनी यावेळी सांगितले.

Visits: 147 Today: 2 Total: 1111888
