राज्यघटनेवर होणाऱ्या आघाताविंरुद्ध संघटित व्हा : माजी मंत्री थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाकवी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विविध संत, छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज, महात्मा गांधी, समाज सुधारक यांना त्रास देणारी धर्मांध वृत्ती आजही कार्यरत आहे. हे लोक वेळीच ओळखा.गोरगरिबांना सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्यघटनेमुळे असून राज्यघटनेवर होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणीही त्यांनी केली.

बस स्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने १०५ व्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, ज्ञानेश्वर राक्षे, विश्वास मुर्तडक, अमर कातारी, प्रमिला अभंग, प्रा. बाबा खरात,राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, संदीप आव्हाड ,संजय जमदाडे, बाबासाहेब साळवे, बापू लहूनडे, गणेश बलसाने, शिवाजी आव्हाड,मनीष राक्षे, वेदांत राक्षे, राजेंद्र राक्षे, विकी पवार, देवेंद्र साळवे,सचिन शेलार, विनोद साळवे,शुभम आव्हाड, किशोर आव्हाड,संतोष गायकवाड, विश्वनाथ आव्हाड, जगन्नाथ आव्हाड, डि.के. जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संत, समाज सुधारक आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजे. त्यांनी ज्या समतेसाठी आवाज उठवला त्या समतेकरता आज पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे. लोकशाहीची दररोज पायमल्ली होत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, नितीन अभंग, राजेश वाकचौरे, पप्पू कानकाटे आदींसह काँग्रेस व मातंग समाजाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 111 Today: 1 Total: 1103240
