महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी पाटील व पहाडे

महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी पाटील व पहाडे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व नगरसेवक मंदार पहाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व नगरसेवक मंदार पहाडे हे शहरातील कर्तबगार व्यक्तीमत्व असून त्यांनी हाती घेतलेल्या व पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सोपविलेल्या सर्व सामाजिक कार्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्याबरोबर शहरातील युवाशक्ती देखील खंबीरपणे उभी आहे. माजी आमदार अशोक काळे, युवा आमदार आशुतोष काळे यांचे ते कट्टर व विश्वासू समर्थक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांचा माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रंसगी ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, दत्तात्रय जगताप, मनोहर कृष्णाजी, श्री साईबाबा तपोभूमी मंदीर समितीचे अध्यक्ष रोहित पटेल उपस्थित होते.

 

Visits: 125 Today: 3 Total: 1106965

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *