हॅम रेडिओच्या स्पर्धेत हंडीनिमगावचे कुटे देशात प्रथम
हॅम रेडिओच्या स्पर्धेत हंडीनिमगावचे कुटे देशात प्रथम
नायक वृत्तसेवा, नेवासा
हॅम रेडिओच्या सीक्यूडब्लूपीएक्स या जागतिक स्पर्धेत नेवासा तालुक्यातील हंडीनिमगांवचे परशुराम कुटे देशात प्रथम तर आशिया खंडात आठवे आले आहेत. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेत सहभाग घेऊन परशुराम कुटे यांनी भारतामधे प्रथम आणि आशिया खंडामध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. कुटे यांनी त्यांच्या हंडीनिमगावमधील घरी हॅम रेडिओचे वायरलेस स्टेशन उभे केलेले असून या माध्यमातून त्यांनी पूर, भूकंप व वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी सक्षम संपर्क यंत्रणा स्वखर्चाने उभी केलेली आहे. लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता कुटे यांना सातार्याचे हॅम रेडिओ ऑपरेटर रोहित भोसले, अलिबागचे दिलीप बापट यांचे मार्गदर्शन लाभले. हॅम रेडिओच्या प्रसारासाठी कुटे अथक प्रयत्न करीत असून त्यांनी हॅम रेडिओ स्टेशन माहिती/प्रशिक्षणकरिता युवकांनी संपर्क करावा असे आवाहन केले आहे. याबद्दल शिर्डी अॅमेचेअर रेडिओ क्लबचे अध्यक्ष डॉ.करणसिंग घुले, जरामजी ठक्कर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, शिवाजी घाडगे, सुरेश वाबळे यांनी अभिनंदन केले आहे.

