मेंढ्याच्या कळपावर बिबट्याचा हल्ला! दोन कोकरांचा मृत्यू; सतरा मेंढ्या जखमी
नायक वृत्तसेवा, आश्वी
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे गोठ्यात असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवत दोन कोकरांच्या नरडीचा घोट घेतला. तसेच इतर मेंढ्यांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये मेंढपाळ शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मेढपाळ संदीप खंडू होडगर यांच्या गोठ्यातील मेंढ्यांच्या कळपावर शुक्रवार (दि.५ जुन) रोजी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याने प्रवेश करत त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन कोकरांच्या नरडीचा घोट बिबट्याने बिबट्याच्या याच हल्ल्यात ५ कोकरे जबर जखमी झाली तर १७ मेंढया किरकोळ जखमी झाल्याचे संदीप होडगर यांनी सांगितले. संदीप खंडू होडगर यांनी गाय, शेळ्या प्रमाणेच जवळपास ३५ मेंढ्या बॅकेचे कर्ज काढून विकत घेतल्या. २० बाय २० च्या ओपन शेड तसेच जवळच असलेल्या पोल्टी फॉर्म मध्ये काही मेंढ्या होत्या, तसेच १०० हून अधिक कोंबड्या देखील होत्या. यामध्ये जवळपास ३० ते ३५ कोंबड्या ही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनपाल रमेश पवार, वनरक्षक सालु सोनवणे, वन कर्मचारी बाळासाहेब डेंगळे तर सरकारी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश नागरगोजे यांनी होडगर यांच्या गोठ्याला भेट देत पंचनामा केला. या घटनेत या गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेचा पंचनामा केला असुन पुढील कारवाई साठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यांच्या आदेशा नुसार पुढील कारवाई केली जाईल असे वनपाल रमेश पवार यांनी सांगितले.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेंढ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असुन यामध्ये ५ ते ६ मेंढ्या जबर जखमी झाल्या आहेत. किरकोळ जखमी मेंढ्या उपचारानंतर लवकर बऱ्या होतील अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश नागरगोजे यांनी दिली.

Visits: 299 Today: 2 Total: 1425376
