लक्ष्मण गाडेकर यांचा आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरव

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण दगडू गाडेकर यांना जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

अहिल्यानगर येथील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मेडीयम स्कूल येथे हा पुरस्कार वितरण समारंभ पार पाडला. शैक्षणिक कारकिर्दीत केलेल्या योगदानाचा गुणगौरव या पुरस्काराने होत असल्यामुळे हा पुरस्कार मानाचा समजला जातो. यावेळी अविनाश बोन्द्रे,राजेंद्र बारबूजे,नवनाथ घुले,संजयकुमार निक्रड,अनिल वाघचौरे, श्रीमती गाडेकर,डॉ. तेजल गाडेकर, एस. के. खेमनर, सहादू खेमनर,भाऊसाहेब खेमनर,इनामदार, कुदळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Visits: 132 Today: 2 Total: 1105985
