मॅरेथॉन स्पर्धेतून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम स्तुत्य : डॉ. सोनवणे

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे

क्रीडा क्षेत्रातही करिअर आणि सरकारी नोकरीच्या संधी मिळू शकतात, मात्र त्याकरता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कामगिरी करण्यासाठी परिश्रम आवश्यक असतात. त्यासाठी खेळाडूंनी परिश्रम घ्यायला हवेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंच तर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम स्तुत्य, असल्याचे प्रतिपादन संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले.

 संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ( जुनेगाव ) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंचतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिवस्वराज्य मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, आंतरराष्ट्रीय धावपटू डॉ. नारायण जाधव, माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर, तात्यासाहेब दिघे, सेवानिवृत्त प्राचार्य बबनराव दिघे, प्राचार्य एच. आर. दिघे, मुख्याध्यापक संदीप सातपुते, प्रभारी सरपंच मयूर दिघे, डॉ. भरत दिघे, निलेश दिघे, इंजि. अश्विनी दिघे, तळेगाव सोसायटीच्या उपाध्यक्षा लहानबाई दिघे, तुकाराम सोळसे, जालिंदर दिघे, रावसाहेब दिघे, दत्तात्रय घोलप, संपत दिघे उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, डॉ. नारायण जाधव, बाबासाहेब कांदळकर, प्राचार्य एच. आर. दिघे, संदीप सातपुते, इंजि. अश्विनी दिघे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे सहित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीतेसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंचचे अध्यक्ष नंदकुमार दिघे यांनी केले. सूत्रसंचालन संपत दिघे यांनी केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित शिवस्वराज्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
शिवस्वराज्य मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रसाद गव्हाणे याने प्रथम क्रमांक, साईनाथ घुगे याने द्वितीय क्रमांक, सुदेश डोखे याने तृतीय क्रमांकाचे तसेच तुषार खुळे व उमेश गुंडे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. तर महिला गटात खुशी हासे हिने प्रथम क्रमांक, कोमल कानवडे हिने द्वितीय क्रमांक, जिजा घोडे हिने तृतीय क्रमांकाचे तसेच शितल पवार व साक्षी जोर्वेकर यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. 
Visits: 205 Today: 1 Total: 1590044

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *