राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या निरीक्षकपदी मापारी
राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या निरीक्षकपदी मापारी
नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यातील आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक लक्षात घेवून संघटनात्मक व पक्षबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी नगरपालिका निरीक्षक व तालुका प्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी नगरपालिका निवडणुकीकरिता अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांची काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुरी तालुक्यात कारखान्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीत विखेंचा वाढता हस्तक्षेप पाहता राहुरी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून त्याच लोणी प्रवरा परिसरातील विखेंचे कट्टर विरोधक, निर्भीड व सडेतोड भूमिकेसाठी परिचित असलेले मंत्री थोरात व आमदार तांबे यांचे विश्वासू, सर्वसामान्य कार्यकर्ते व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांच्याकडे निरीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याने अनेक राजकीय विश्लेषकांनी भुवया उंचावल्या आहेत. पक्षाचे निरीक्षक म्हणून निवड झाल्याने त्यांच्या कौशल्य व संघटनात्मक भूमिकेकडे विशेष लक्ष असणार आहे. याबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, लहु कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, करण ससाणे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शिर्डी काँग्रेस नेते सुरेश थोरात, डॉ.एकनाथ गोंदकर, बाळासाहेब चव्हाण, राहुरी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, अमृत धुमाळ, पंढुतात्या पवार, बाबासाहेब धोंडे, संजय पोटे, राजू बोरुडे, संजय भोसले, जिल्हा एससी काँग्रेस सेलचे कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे यांच्यासह राहुरी तालुक्यातील, शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.

