‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’चा रविवारी शुभारंभ
‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’चा रविवारी शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील कापड व्यवसायामध्ये आणखी एका दालनाची भर पडणार आहे. शहरातील ऑरेंज कॉर्नरजवळील सह्याद्री महाविद्यालयासमोर रविवारी (ता.18) सकाळी 10 वाजता ‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’ या नवीन दालनाचा शुभारंभ साईभक्त इंगळे बाबा, माताजी अयोध्यादेवी गिल आणि जडावदेवी जाजडा यांच्या हस्ते होणार आहे.

संगमनेरची कापड बाजारपेठ अवघ्या जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे. यामध्ये ‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’ने आणखी भर पडणार आहे. नामांकित कंपनीचे सर्व कापड, साडी, बेडशीट, ब्लँकेट, चादर, पायदान, सतरंजी, रेडिमेड कपडे आदी किफायतशीर दरामध्ये खास विविध ढंगामध्ये उपलब्ध असणार आहेत. दसर्याचा आणि दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या दालनास अवश्य भेट देऊन खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. तसेच शुभारंभ प्रसंगी ग्राहकांनी, हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक श्रीनिवास भंडारी, मनोज भंडारी, भंवरलाल जाजडा, जसराज जाजडा, गोविंद गिल आदिंनी केले आहे.

