संभाजी भिडेंविरोधात संगमनेरात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला; तातडीने अटक करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी अशी मागणी करत काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
संगमनेर बसस्थानक येथे संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन झाले यावेळी दुर्गा तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, निखील पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात, जावेद शेख, पद्मा थोरात, अर्चना बालोडे, सुनंदा जोर्वेकर, संतोष हासे, संपत डोंगरे, गणेश मादास, दत्तू कोकणे, सुरेश झावरे, नवनाथ आंधळे, अनिकेत घुले आदिंसह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
याप्रसंगी बोलताना बाबा ओहोळ म्हणाले, राष्ट्र पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी संभाजी भिडे हे काही बेताल वक्तव्य करत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे अशा या माणसाला तातडीने अटक करून कडक शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली.
दुर्गा तांबे म्हणाल्या, एका बाजूला मणिपूर जळते आहे. तर दुसर्या बाजूला महाराष्ट्रातही शांतता भंग करण्यासाठी भिडे सारख्या व्यक्ती बेताल वक्तव्य करत आहेत. महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ऐवजी काही विचारसरणीचे लोक देश भावना निर्माण करत आहेत अशांना जरब बसविण्यासाठी तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी के. के. थोरात, संजय कोल्हे, उबेद शेख, विष्णूपंत रहाटळ, विजय उदावंत, विजय राहणे, सुभाष सांगळे, भास्कर शेरमाळे, गणपत सांगळे, अंबादास आडेप, आनंद वर्पे, जयराम ढेरंगे, भाऊसाहेब शिंदे, मीनानाथ वर्पे, माणिक यादव, शिवाजी जगताप, गौरव डोंगरे आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.