फोडसे व दराडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर
फोडसे व दराडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील आढळा परिसरातील समशेरपूर ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता फोडसे व उपसरपंच सचिन दराडे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचा आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

अकोले तालुक्यातील समशेरपूर ही मोठी ग्रामपंचायत असून राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या ग्रामपंचायतचा कारभार उपसरपंच सचिन दराडे यांच्या नेतृत्वाखाली गेली साडे चार वर्षे समर्थपणे चालू आहे. अतिशय वेगाने विकासकामे होत आहेत. यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून मंगल कार्यालय उभे केले आहे. तसेच समशेरपूर ते आढळा धरण नळ पाणी पुरवठा योजना नुकतीच पूर्णत्वास आली असून, यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. ग्रामस्वच्छता अभियानात गावाने उत्कृष्ट कामगिरी करत ‘स्वच्छ समशेरपूर, सुंदर समशेरपूर’ ही योजना राबविली आहे. कोरोना काळातही ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करत आहे. या कामांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी उपसरपंच सचिन दराडे व सरपंच अनिता फोडसे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे होणार आहे. याबद्दल उपसरपंच दराडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

