आश्वी बुद्रुकची कन्या महिला प्रिमियर लिगचे मैदान गाजवणार! अष्टपैलू पूनम खेमनरची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात झाली निवड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पहिल्यावहिल्या महिला प्रीमियम लिग म्हणजे ‘डब्ल्यूपीएल’मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकर्‍याची मुलगी पूनम खेमनर हिची निवड झाली आहे. ही आनंदाची बातमी पंचक्रोशीत समजताच पूनमवर अभिनंदनाचा वर्षाव करण्याबरोबरचं नुकताच ग्रामस्थांनी तिचा संत्कार केला आहे.

आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यावर मात करत जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर महिला प्रीमियर लिगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात तिची निवड झाली ही राज्याच्या व आश्वी ग्रामस्थांसाठी गौरवास्पद बाब आसल्याचे गौरवोद्गार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अ‍ॅड. शाळीग्राम होडगर यांनी काढत पूनमचे कौतुक केले. आपण सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी इच्छुक असल्याच्या भावना पूनम खेमनरने व्यक्त केल्या. भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या महिला प्रीमियर लिगसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आश्वी बुद्रुकची कन्या पूनम खेमनर हिचा संघात समावेश केला आहे. तिच्या निवडीनंतर आश्वी व परिसरातील गावांमध्ये जल्लोष करत सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तिच्यासह सहकारी सोमवारी (ता.13) रात्री उशिरा शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आश्वी बुद्रुक येथे दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी आश्वी बुद्रुक येथे फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशाच्या गजरात पूनमचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी आश्वी व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, जैन श्रावक संघ, आश्वी बुद्रुक चालक मालक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत व सत्काराचे आयोजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अ‍ॅड. शाळीग्राम होडगर होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका अ‍ॅड. रोहीणी निघुते, माजी सरपंच बाळकृष्ण होडगर, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, पोलीस निरीक्षक सुभाष भोये, पत्रकार सीताराम चांडे, विनायक बालोटे, सुमतीलाल गांधी, ईश्वर भंडारी, संजय गांधी, वसंत गांधी, हर्षल खेमनर, गंगाधर आंधळे, एकनाथ ताजणे, मिलिंद बोरा, संजय गायकवाड, अनिल शेळके, रवींद्र बालोटेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पूनम खेमनर रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र संघाकडून पाच वर्ष तसेच नागालँड संघाकडून दोन वर्षांपासून खेळत होती. याप्रसंगी तिची आई सुवर्णा, वडील नानासाहेब खेमनर, प्रशिक्षक अविनाश शिंदे, सनातन विनोद, बाबु सक्लाम, नागालँड संघाची खेळाडू गौतमी नाईक यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश रातडीया, प्रितम गांधी, सनी भंडारी, बबन खेमनर, संदीप खेमनर आदिंनी परीश्रम घेतले.

Visits: 119 Today: 1 Total: 1109834

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *