सलग दुसऱ्या फेरीतही बाळासाहेब थोरात पिछाडीवर! महायुतीचे अमोल खताळ यांची आघाडी; तळेगाव गटातील मतमोजणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मतदानाच्या काही दिवस आधी अचानक राज्याच्या चर्चेत आलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्या फेरीतही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. तळेगाव जिल्हा परिषद गटातील ईव्हीएम मशीनच्या मोजणीत महायुतीचे अमोल खताळ दुसऱ्या फेरीतही साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत देवकौठे, पारेगाव बु, निमोण, चिंचोली गुरव या गावांतील मतांची तर, दुसऱ्या फेरीत तळेगाव दिघे, सोनोशी, पारेगाव खुर्द, चिकणी, सायखिंडी, करे या गावांचा समावेश आहे. दुसऱ्या फेरीअखेर 6 हजार 288 तर, बाळासाहेब थोरात यांना 3 हजार 627 मतं मिळाली आहेत. एकूण दोन फेरीत खताळ यांना 10 हजार 307 व थोरात यांना 7 हजार 813 मतं मिळाली आहेत.
Visits: 74 Today: 1 Total: 309295