कोपरगाव शिवसेनेचे इंडियन मेडिकल असोसिएशनला निवेदन

कोपरगाव शिवसेनेचे इंडियन मेडिकल असोसिएशनला निवेदन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या संकटात भारतातील डॉक्टर्सने आपला जीव धोक्यात घालून अनेक लोकांचे प्राण वाचवले. परंतु काही डॉक्टर्स कोरोनाच्या भीतीने आपले बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवत आहेत. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच रविवारी अनेक दवाखाने बंद असल्याने लहान मुलांना व ज्येष्ठांना उपचार घेण्यास शहरात विविध ठिकाणी फिरावे लागते. तरी देखील त्यांना उपचार मिळत नाही. म्हणून कोपरगाव शिवसेनेकडून उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.


सदर निवेदनात शिवसेनेने म्हंटले आहे की, रविवारी बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्यास आपण कोपरगावातील डॉक्टरांना आवाहन करावे, प्रत्यक्ष उपचार देता येत नसेल तर किमान आपण फोनद्वारे औषधे सूचवावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यास प्रतिसाद देत डॉ.जोर्वेकर यांनी आश्वासन दिले की, मी या विषयावर कोपरगावातील डॉक्टरांशी संपर्क साधला असून सर्व डॉक्टरांनी रविवारी ओपीडी सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच फोनद्वारे एमरजन्सी कन्सल्टन्सी घेण्यासाठी त्यांनी शहरातील डॉक्टरांची यादीही दिली. यावेळी एसटी कामगार सेनाप्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, युवा नेते विक्रांत झावरे, वाहतूक सेना तालुका प्रमुख इरफान शेख, गगन हाडा, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, विशाल झावरे, विभागप्रमुख विकास शर्मा, वसीम शेख, समीर पठाण, अक्षय वाकचौरे, अक्षय नन्नवरे, आकाश कानडे, वाल्मिक चिने, रितेश राऊत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

Visits: 51 Today: 1 Total: 431643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *