सहारा एंटरप्राइजेसच्या संचालिका पठाण यांची नेवासा नगरपंचायतला भेट

सहारा एंटरप्राइजेसच्या संचालिका पठाण यांची नेवासा नगरपंचायतला भेट
नायक वृत्तसेवा, नेवासा
औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा सहारा एंटरप्राइजेसच्या संचालिका शकीला पठाण यांनी नुकतीच नेवासा नगरपंचायतला भेट दिली आहे. यामध्ये त्यांनी केंद्राच्या विविध शासकीय योजना शहरात राबविण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह नगरसेवकांशी चर्चेद्वारे संवाद साधला. शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही संस्थाना मार्गदर्शन करतो व त्याद्वारे तळागाळात त्या योजना नेण्याचा प्रयत्न करतो अशी माहिती त्यांनी बोलताना दिली.


सहारा इंटरप्राइजेस कंपनीच्यावतीने शकीला पठाण यांच्या हस्ते नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पठाण यांनी सहारा इंटरप्राइजेसच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान व रमाई घरकुल योजना तसेच इतर योजनांची माहिती देऊन नगरपंचायतने संधी दिल्यास आम्ही देखील नेवासा शहरासाठी विविध योजना आणून काम करून दाखवू अशी ग्वाही दिली. दरम्यान, शहर विकासाच्या दृष्टीने नगरपंचायतचे मार्गदर्शक प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा करून निश्चितच भरीव काम करण्याची भूमिका राहील असे उपनगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक दिनेश व्यवहारे, सचिन वडागळे, संदीप बेहळे, जितेंद्र कुर्‍हे, भारत डोकडे, रणजीत सोनवणे, पत्रकार सुधीर चव्हाण, अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा तमन्नाबी शेख उपस्थित होते.

Visits: 55 Today: 1 Total: 438292

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *