सप्टेंबर अखेर सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू होणार ः आ.डॉ.लहामटे

सप्टेंबर अखेर सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू होणार ः आ.डॉ.लहामटे
नायक वृत्तसेवा, अकोले
सरकारी निधी आणि लोकसहभागातून सप्टेंबर महिनाअखेर अकोले तालुक्यात सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार डॉ.किरण लहामटे यांनी व्यक्त केला आहे.


अकोले पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी (ता.24) तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय नेत्यांची सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार लहामटे यांनी वरील विश्वास व्यक्त करत आमदार निधीतून अद्ययावत रुग्णवाहिका, एक्स-रे मशीन व रक्त पेशी मोजण्याचे यंत्र लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगून, नवीन भांडकोळी रुग्णालयात पन्नास खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असून स्वखर्चाने आणखी 25 खाटा वाढविणार असल्याचे सांगितले. तसेच संक्रमण रोखण्यासाठी मास्क अथवा रुमाल, सुरक्षित अंतर आणि गर्दी टाळणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे म्हणाले, अकोल्यात अद्ययावत कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली असून लवकरच सरकारी निधी मिळेल. परंतु कोविड रुग्णालयासाठी तालुक्यातील सहकारी संस्था, व्यापारी व दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन केले. अकोले तालुक्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी नेते दशरथ सांवत, डॉ.अजित नवले, विनय सांवत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, काँग्रसेचे दादापाटील वाकचौरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, आरिफ तांबोळी, महेश नवले, डॉ.संदीप कडलग, संजय वाकचौरे, सुरेश नवले, शांताराम वाळुंज, मारुती मेंगाळ, राजेंद्र कुमकर, विकास बंगाळ, चंद्रभान नवले, संपत नाईकवाडी, चंद्रकांत भोत, हेरंब कुलकर्णी, असीफ तांबोळी, सोन्याबापू वाकचौरे, स्वाती शेणकर, अरुण रुपवते आदी उपस्थित होते.

 

Visits: 10 Today: 1 Total: 119056

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *