अहमदनगर जिल्ह्यातील 22 खासगी पेट्रोल पंप बंद! इंधन दरवाढीबरोबर नागरिकांना इंधन टंचाईचा झटका

नायक वृत्तसेवा, नगर
गेल्या नऊ दिवसांपासून इंधन दरवाढ होत असल्याने इंधन दराचा भडका उडाला आहे. त्यातच आता अपुरा पुरवठा होत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील 22 खासगी पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना इंधन टंचाईला समोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यात सरकारी पेट्रोलियम कंपनी संचलित आणि थेट कंपनीकडून एजन्सी मिळालेले पंप आहेत. यासोबतच काही खासगी कंपन्यांचे पंपही आहेत. सध्या इंधन दरवाढ झालेली असताना इंधनाची टंचाईही आहे. त्यामुळे या खासगी पंपांना पुरवठा होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील असे 22 पंप सध्या बंद आहेत. त्यामुळे तेथील ग्राहकांची अन्य पंपांवर गर्दी होत आहे.

जिल्ह्यात रिलायन्सचे सुमारे 18 पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी नगर शहरातील एकमेव पंप सुरू आहे. तेथील साठा संपल्यावर तोही बंद होण्याची शक्यता आहे. पेट्रोलपंप चालकांकडून डेपोकडे इंधनाटी मागणी होत असली तरी पुरेसा इंधन पुरवठा होत नसल्याने, पेट्रोलपंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नगरला मायराचे तीन पंप आहेत. हे पंप इंधन टंचाईसह इतर कारणांमुळे तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याची माहिती समजली.

अहमदनगरमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ होऊन 114 रुपये 97 पैसे प्रतिलिटर झाले आहे. दहा दिवसांत पेट्रोल 109 वरून 114 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचा दर 97 रुपये 84 पैशांवर पोहोचला आहे.

Visits: 100 Today: 3 Total: 1098884

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *