श्रीरामपूरमध्ये शेतकरी आंदोलनाच्या यशाबद्दल विजयोत्सव साजरा सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग; केंद्र सरकारवर जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
केंद्र सरकारने केलेले सुधारित कृषी कायदे रद्द करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.19) सकाळी केली. दिल्लीसह देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या लढ्यातील पहिल्या टप्प्यातील विजय मानला जातो. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरातील मेनरोड समोरील महात्मा गांधी चौकात भाजप वगळता शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी-कामगारांच्यावतीने शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने दिल्लीतील शेतकरी आंदोलनास यश आल्याबद्दल फटाके फोडून विजयोत्सव देखील साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार लहू कानडे, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, श्रीकृष्ण बडाख, कामगार नेते नागेश सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, कैलास बोर्डे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अॅड. समीन बागवान, संविधान बचाव समितीचे अहमद जहागिरदार, लाल निशाण पक्षाचे जीवन सुरूडे, फैय्याज इनामदार, प्रहार संघटनेचे विवेक माटा, सागर दुपाटी, शिवसेनेचे सचिन बदडे, यासिन सय्यद, चरण त्रिभुवन, संतोष मोकळ, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार कानडे, लकी सेठी, राजेंद्र बावके, नागेश सावंत, अमरप्रित सेठी, संतोष मोकळ, जीवन सुरूडे, अहमद जहागिरदार, विवेक माटा यांची भाषणे झाली. संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी आंदोलनाच्या तीन मुख्य मागण्यांपैकी केंद्राने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आज झाली. परंतु त्यासोबत किमान आधारभूत किंमतीचा केंद्रीय कायदा व्हावा व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करण्यासाठी किसान आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अद्यापही कायम आहे. आजची घोषणा हा पहिल्या टप्प्यातील विजय असून कृषी कायदे जोवर संसदेत प्रत्यक्षपणे रद्द होत नाहीत. तसेच जोवर सरकार कृषी आंदोलनाच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करीत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा व्यक्त केला. यावेळी शंकर फरगडे, सुनील इंगळे, अजय बत्तीसे, सुयोग ससकर, सरबजीतसिंग सेठी, राहुल दाभाडे, विजय शेळके, सुभान पटेल, संतोष केदारी, दीपक शेळके, लखन डांगे, दीपक कदम, तोफिक शेख उपस्थित होते.
