श्रीरामपूरमध्ये वरीष्ठ परिवहन अधिकार्‍यास दोघांची मारहाण शहर पोलिसांत गुन्हा दाखल; अधिकारी व कर्मचार्‍यांनी नोंदविला निषेध

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
ऑनलाईन नोंदणी न करताच तत्काळ कागदपत्रांची मागणी करुनही ती दिली नाही म्हणून शिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोघांनी परिवहन अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ अधिकार्‍यास शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून ताब्यात घेतले आहे.

शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आमची नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर परिवहन अधिकार्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करा. मात्र हे दोेघे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी त्या अधिकार्‍यास शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन मारहाण केली. यावेळी परिरातील वातावरण संतप्त झाले होते.

या घटनेची माहिती कळताच सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेवून घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी आपल्या सहकार्‍यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. या दोघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून अशा घटनेचा निषेध करत होते. या दशतीमुळे परिवहन कार्यालय परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुद्ध शिवीगाळ करुन मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांसह कर्मचारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *