नेवाशामध्ये राज्य शासनाचा मराठा समाजाच्यावतीने निषेध
नेवाशामध्ये राज्य शासनाचा मराठा समाजाच्यावतीने निषेध
नायक वृत्तसेवा, नेवासा
महाराष्ट्रातील मराठा समाजाची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची मागणी खूप वर्षांनंतर मंजूर झाली होती. त्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मराठा आरक्षण प्रश्न सुटला असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य शासनाचा नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती चौकात नुकताच निषेध करण्यात आला.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर पेचे, मनोज पारखे, नगरसेवक सुनील वाघ, सतीष गायके, सचिन भांड, सचिन नागपुरे, अंकुश काळे, शिवाजी मोरे, आदिनाथ पटारे, डी. बी. टेकाळे, उमेश ठाणगे, विकी परदेशी, राजेश उपाध्ये, अमोल कोकणे, गणेश दुधे, अंबादास उंदरे, प्रताप चिंधे आदी सकल मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच राज्य सरकारचा जोरदार निषेध केला.