‘त्या’ आरोग्य सेविकेबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्यांना अहवाल
‘त्या’ आरोग्य सेविकेबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्यांना अहवाल
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वारंघुशी महिला बाळंत प्रकरणी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्यो तालुका आरोग्य अधिकार्यांनी ‘त्या’ आरोग्य सेविकेचा चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे कारवाईसाठी पाठविला आहे. आता ते कार्य निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.
बाळंतपणासाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वारंघुशीच्या उपकेंद्रात आली असताना या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क घरात लपून बसल्या होत्या. अखेर गावातील सुईन आणि आशा सेविका यांनी प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी त्या महिलेचे नैसर्गिकरित्या बाळांतपण झाले. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी व बाळंत महिलेच्या पतीने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, आणीबाणीच्या प्रसंगी आरोग्य सेविकेने प्रसंगावधानाकडे दुर्लक्ष करत घरात लपून बसल्यामुळे ग्रामस्थांनी या आरोग्य सेविकेला निलंबित करत नाहीत तो पर्यंत या उपकेंद्रास टाळे ठोकले आहे. तर या आरोग्य सेविकेचा चौकशी अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे कारवाईसाठी पाठविला असून उपस्थित नसलेल्या दुसर्या आरोग्य सेविकेस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.