मुकिंदपूर शिवारात वाहनाचा अपघात एक ठार; पाच जखमी
मुकिंदपूर शिवारात वाहनाचा अपघात एक ठार; पाच जखमी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यात नेवासा फाटा येथे मुकिंदपूर शिवारात नुकताच नगर-औरंगाबाद रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रक्स क्रुझर गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये एक ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे.
नगर-औरंगाबाद रस्त्यावरुन जाणारा ट्रक्स क्रुझर (क्र. एमएच.27, एआर.9749) हिच्यावरील चालकाने मुंबई येथून औरंगाबादकडे जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालविल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली व मोठा अपघात झाला. या अपघातात गाडीतील साहेबराव जगदेव डोंगरे (वय 60, रा. एबलापूर, ता.जि.अकोला) हे जागीच ठार झाले तर बाजीराव सूर्यभान दामोधर, (वय 67 रा. एबलापूर) यांच्यासह प्रमिला दामोधर, मंगल वानखिंडे, श्रीकांत रणगिरे, पांडूरंग दागडे हे पाचजण गंभीररित्या जखमी झाले. जखमी बाजीराव सूर्यभान दराडे यांच्या फिर्यादीवरुन गाडीचालक प्रदीप बाजीराव दामोधर (रा.एबलापूर, ता.जि.अकोला) याच्याविरुद्ध नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.