मित्राचा खून करणार्‍या आरोपीस चोवीस तासांत अटक श्रीरामपूर येथील खून प्रकरण; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर येथे मागील वादाच्या किरकोळ कारणावरून एकाचा खून झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मयत व्यक्तीचा मित्र असलेल्या आरोपीला २४ तासांत जेरबंद केले आहे. अशोक साळवे (रा. नॉर्दन ब्रॉच, श्रीरामपूर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे.

श्रीरामपूर येथे शाहरुख उस्मान शाह या तरुणाचा खून झाला होता. त्याप्रकरणी शाहरुखचा भाऊ साकीब उस्मान शाह याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयत शाहरुखच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. यात शाहरुख व अशोक साळवे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता अशोक साळवेवर पथकाचा संशय बळावला.

त्यानुसार पथकाने अशोकला पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथून जेरबंद केले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात शाहरुखच्या डोक्यात फरशी मारून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली आहे.

Visits: 89 Today: 1 Total: 1099863

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *