संगमनेर पालिकेकडून माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट ः तांबे
संगमनेर पालिकेकडून माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट ः तांबे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे काम करणार्या सर्व माजी सैनिकांचा उचित सन्मान व्हावा; यासाठी राज्यातील आघाडी सरकारने नगरपालिका कार्यक्षेत्रात राहणार्या माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता करात पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेकडून तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

या योजनेची अधिक माहिती देताना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, माजी सैनिकांची देशसेवा लक्षात घेऊन त्यांचा उचित सन्मान व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाने माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करमाफी योजनेंतर्गत पूर्णपणे मालमत्ता व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी संगमनेर नगरपरिषदेने सुरू केली आहे. अंमलबजावणीकामी उपनगराध्यक्षा सुमित्रा दिड्डी, सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी पुढाकार घेतला आहे.
![]()
