राहुरी तालुक्यात कोरोनाने घेतला दोघांचा बळी
राहुरी तालुक्यात कोरोनाने घेतला दोघांचा बळी
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील 67 वर्षांच्या स्त्री रोग तज्ज्ञ आणि टाकळीमियाँ येथील 32 वर्षांच्या तलाठ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे.

राहुरी तालुक्यात आत्तापर्यंत 745 नागरिकांना बाधा झाली होती. त्यातील 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बाधित रुग्णांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोविड सेंटर, तसेच राहुरी कारखाना येथील नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान अहमदनगर शहर व जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाने आणखी 20 जणांचे बळी घेतले. तर बळींची एकूण संख्या 409 झाली आहे.

Visits: 86 Today: 1 Total: 1110977
