युवक काँग्रेसची केंद्राकडे ‘रोजगार दो’ची मागणी

युवक काँग्रेसची केंद्राकडे ‘रोजगार दो’ची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दरवर्षी 2 कोटी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या बेरोजगारीवर पावले उचलून केंद्र सरकारने मदत करावी. आणि देशातील तरुणांना तातडीने नोकर्‍या उपलब्ध करून द्याव्यात यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर युवक काँग्रेसच्यावतीने नुकतेच तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सरकारकडे ‘रोजगार दो’ची मागणी केली आहे.


तहसीलदार अमोल निकम यांना हे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सचिन खेमनर, रमेश गफले, तान्हाजी शिरतार, भागवत कानवडे आदी दाधिकारी उपस्थित होते. देशात लॉकडाऊनमुळे साधारण 12 ते 15 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. तर बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांवर पोहोचला आहे ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी याला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असून मागील 20 लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज ही केवळ घोषणा ठरली असून त्यातून कोणत्याही घटकाला मदत झाली नसल्याचा आरोप केला आहे. या मागणीची अंमलबजावणी तातडीने न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे.

Visits: 124 Today: 2 Total: 1107808

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *