रस्ते मजबुतीकरणासाठी ८५ लाखाचा  निधी मंजूर : आ.सत्यजित तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
सुसंस्कृत विकसित व शांत अशी राज्यात ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. याचबरोबर नव्याने तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.
तालुक्यातील विविध रस्त्यांकरता मंजूर झालेल्या निधीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, दुष्काळी तालुका ते वैभवशाली तालुका ही ओळख माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेरची झाली आहे. संगमनेरची सर्वांगीण प्रगती ही त्यांच्या नेतृत्वात झाली आहे.नेहमी गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी काम करणारे  बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध रस्त्यांकरता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ मध्ये ३०५४, ३०६८ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये मंगळापुर  येथील राष्ट्रीय महामार्ग ५० ते मंगळापूर रस्ता सुधारणा करणे कामाकरता १५ लाख,निमगाव बुद्रुक येथील नांदुरी दुमाला ते निमगाव बुद्रुक रस्ता सुधारणा कामासाठी १५ लाख,धांदरफळ खुर्द येथील धांदरफळ खुर्द ते डोंगरे वस्ती रस्ता सुधारणासाठी १५ लाख,वडगाव लांडगा येथील जवळेकडलग रस्ता सुधारणासाठी १० लाख, धुपे येथील दिघे वस्ती रस्ता सुधारणासाठी १० लाख , तर चिखली येथील मेमाने वस्ती रस्ता सुधारणासाठी २० लाख रुपये असे एकूण ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीमधून सदर रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक समृद्ध होणार असून नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सोय होणार आहे. हा निधी मिळून दिल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे मंगळापुर, चिखली, धुपे,निमगाव बुद्रुक, धांदरफळ खुर्द,वडगाव लांडगा, जवळेकडलग येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. याउलट सध्याचे सत्ताधारी काम करण्यापेक्षा निगेटिव्ह भूमिका घेत आहेत.अशांत झालेले संगमनेर, दडपशाही यामुळे संगमनेर शहरातील व तालुक्यातील नागरिक अस्वस्थ असून सर्व जनता  बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी पुन्हा एकवटली आहे. काम बोलतय नाणं खणखणीत आहे अशा पोस्ट सोशल मीडियावर झळकत आहेत.

Visits: 72 Today: 2 Total: 1112024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *