गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणात संगमनेर अग्रेसर : नागणे नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व आदर्श शाळांचा सत्कार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये संगमनेर शिक्षण विभाग करत असलेली नेत्रदीपक कामगिरी तालुक्यासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार अध्यक्षपदावरून बोलताना गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले.

व्ही स्कूल घटक निर्मिती शिक्षक सत्कार, नवोदय निवड विद्यार्थी गुणगौरव, स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळा व आदर्श शाळा सत्कार सोहळा येथील सह्याद्री महाविद्यालयातील सभागृहात संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेचे रजिस्टार बी. आर. गवांदे, सह्याद्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, एम. वाय. दिघे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, लोटस विद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलिमा निघुते, केंद्रप्रमुख दशरथ धादवड, अशोक गोसावी, प्रभाकर रोकडे, यशवंत आंबेडकर, विद्या भागवत, अलका साखरे, पंचायत समितीचे वरिष्ठ लिपीक अरुण जोर्वेकर, संदीप मंडलिक, प्रदीप कुदळ, संदीप मोरे, योगेश मोरे, संदीप कवडे, दत्ता लेंडाळ, नंदू रकटे, गंगाधर टेंगळे, महेश काळे, सुजाता वाघ, वैशाली गुंजाळ, संगीता गायकवाड, दिगंबर फटांगरे, शांताराम आंबरे, शिवाजी आव्हाड, मन्सूर पटेल आदिंसह तालुका शिक्षण समिती सदस्य उपस्थित होते.

प्रास्ताविक व्ही स्कूल ऍपचे तालुका समन्वयक, तंत्रस्नेही शिक्षक सुरेश भारती यांनी केले. इशस्तवन व स्वागतगीत सादरीकरण निळवंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. सर्व शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयातून संगमनेर तालुक्यात शिक्षण विभागाचे मोठे काम उभे राहत आहे. यात खारीचा वाटा उचलायला मिळतो याचा अधिक आनंद आहे, असे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या.

कोरोना काळानंतर देखील अभ्यासपूर्व तयारी (होम वर्क) आणि शिक्षकांसाठीही उपयुक्त असणारे व्ही स्कूल ऍप आज देखील महत्त्वाचे ठरत असून, वर्गात ऑफलाईन शिक्षणात देखील मोठ्या स्क्रीनवर या ऍपमधील आपल्याच जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेले अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना पाहता येते ही एक पर्वणीच ठरली आहे. संगमनेर तालुक्याने तयार केलेल्या अभ्यास साहित्याचा उपयोग करून खेडोपाडी हे साहित्य उपलब्ध झाले. यातून प्रेरणा घेत वृंदा पोखरकर आणि विराट खाडे या विद्यार्थ्यांनी नवोदयमध्ये प्रवेश मिळवला आहे. या सर्व बाबींचे विवेचन व्ही स्कूल समनव्यक राहुल बांगर यांनी केले. व्ही स्कूल निर्मिती कार्यशाळेसाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ.देवेंद्र ओहरा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य कारभारी वाकचौरे, कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे प्रख्यात विमा प्रतिनिधी बी. के. जोशी व्ही स्कूल अ‍ॅप जिल्हा समन्वयक राहुल बांगर यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश भारती, सुनील झावरे, सुनील घुले, हौशीराम मेचकर, संजय लिमकर, मच्छिंद्र ढोकरे, सुनील आढळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ घुले यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील घुले यांनी केले.

Visits: 146 Today: 1 Total: 1577209

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *