कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोलेत आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना पायी वारी करताना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.5) भाजप व अध्यात्मिक आघाडीच्यावतीने कोल्हार-घोटी मार्गावर अकोले बाजारतळासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. माजी आमदार पिचड हे स्वतः गळ्यात टाळ टाकून भजनात दंग झाले होते. रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

आंदोलनात अकोले तालुका वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष दीपक महाराज देशमुख, भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, शहराध्यक्ष सचिन शेटे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी नगरसेवक परशुराम शेळके, युवा मोर्चाचे राहुल देशमुख, एनटी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, किरण महाराज शेटे, राजेंद्र महाराज नवले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलन सुरू असताना सायरन वाजवत रुग्णवाहिका आल्याचे लक्षात येताच आंदोलक कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

Visits: 152 Today: 1 Total: 2121661

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *