अकोले तालुका पत्रकार संघाचा पावसाळी दौरा उत्साहात

अकोले तालुका पत्रकार संघाचा पावसाळी दौरा उत्साहात
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुका पत्रकार संघाने नुकताच पावसाळी दौरा आयोजित केला होता. या दौर्‍यात आढळा परिसरातील पाडोशी लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.


पाडोशी लघु पाटबंधारे प्रकल्पाची क्षमता 146 दशलक्ष घनफूट असून टाहाकारी, सांगवी, सावरगाव पाट व समशेरपूर या गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग होतो. हा लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरल्याने परिसरातील बळीराजा सुखावला असून त्याची आठमाही सिंचनाची बेगमी झाली आहे. तसेच विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या पट्टेवाडी या अतिदुर्गम आदिवासी गावातील सुरेखा हौशीराम गोडे ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल अकोले तालुका पत्रकार संघाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला व तिला पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पत्रकार संघाचे विश्वस्त डी.के.वैद्य, अध्यक्ष हेमंत आवारी, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.अनिल आरोटे, सचिव चंद्रशेखर हासे, रामलाल हासे, अल्ताफ शेख, ज्ञानेश्वर खुळे, दत्ता रत्नपारखी, नरेंद्र देशमुख, निखील देशमुख, संदीप देशमुख व बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.

Visits: 163 Today: 1 Total: 1867787

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *