कोविड मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करणार्या संगमनेर शहराचे स्वप्न भंगले! शहरासह तालुक्याला आज पुन्हा बसला मोठ्या रुग्णसंख्येचा धक्का..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून उताराला लागलेल्या दैनिक रुग्णसंख्येमुळे संगमनेर शहरासह तालुका कोविड मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याला आता धक्का बसला असून तब्बल तीन आठवड्यानंतर उच्चांकी रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी शहरातील रुग्णसंख्या शून्य झाली होती, मात्र आज शहरासह तालुक्यातील रुग्णगतीला वेग आला असून आज शहरातील 19 जणांसह एकूण 71 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता 22 हजार 720 झाली आहे.

जूनच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र असतांना संगमनेरात मात्र दिलाशाचे दिवस यायला जूनचा दुसरा आठवडा उजेडला. 5 जूनपासून संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीला ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आणि गेल्या जवळपास पंधरवड्यापासून तालुक्यातील रुग्णगती मंदावण्यास सुरुवात झाली. या श्रृंखलेत सोमवारी संगमनेरकरांना सर्वात मोठा दिलासा मिळाला. कालच्या एकूण अहवालांमध्येही मोठ्या प्रमाणात घट होवून शहरातील रुग्णसंख्या शून्य तर तालुक्यातील अवध्या 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ते 24 तासांपेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या 53, खासगी प्रयोगशाळेच्या 11 व रॅपिड अँटीजेनच्या सात अहवालातून तालुक्यातील एकूण 71 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 75, 70 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 52, 50 व 47 वर्षीय इसम38, 36, 3228, 27 व 17 वर्षीय तरुण आणि 66, 60 वर्षीय दोन, 57, 47, 42 व 40 वर्षीय महिला अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील हिवरगाव पठार येथील 60 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42, 40, 34 व 31 वर्षीय तरुण आणि 67 व 55 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 10 वर्षीय मुलासह सात वर्षीय बालिका, पिंपळगाव निपाणी येथील 55 वर्षीय इसम, राजापूर येथील 24 वर्षीय महिला, निमगाव खुर्द मधील 49 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 44 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 53 व 48 वर्षीय इसमांसह 42, 41 व 28 वर्षीय तरुण, 51, 34 व 27 वर्षीय महिला आणि सहा वर्षीय बालिका, शिबलापूर येथील 57 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 34 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 70 वर्षीय महिलेसह 57 वर्षीय इसम, आश्वी खुर्द मधील 81 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम, समनापूर येथील 50 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 45 वर्षीय महिला, कुरकुंडी येथील 48 वर्षीय महिला,

कासारवाडीतील 60 वर्षीय महिला, कनोलीतील 70 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 38 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 40 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 55 वर्षीय महिला, खळी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पोखरी हवेलीतील 29 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 40 व 22 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय तरुण व सात वर्षीय मुलगा, साकूर येथील 45 वर्षीय दोन इसम, निंभाळे येथील 35 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व खंदरमाळ येथील 31 वर्षीय तरुण, आजच्या एकूण अहवालातून तालुक्यातील 27 गावे आणि वा या-वस्त्यांमधून 52 तर शहरातून 19 जणांना कोविडची लागण झाली असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 720 झाली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील 265 जणांवर उपचार सुरु आहेत.

आज संगमनेर शहरासह जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही वाढ नोंदविली गेली. शासकीय प्रयोगशाळेचे 89, खासगी प्रयोगशाहेचे 109 व रॅपिड अँटीजेनच्या निष्कर्षातून 254 अशा जिल्ह्यातील एकूण 452 जणांना संक्रमण झाल्याचे आज समारे आले. त्यात सर्वाधीक 93 रुग्ण पारनेर तालुक्यातून समोर आले. त्या खालोखाल संगमनेर 71, श्रीगोंदा 37, पाथर्डी 33, राहाता 29, कर्जत व शेवगाव प्रत्येकी 26, अकोले 22, राहुरी 19, नगर ग्रामीण व नेवासा प्रत्येकी 17, जामखेड 15, कोपरगाव 14, इतर जिल्ह्यातील 13, श्रीरामपूर 10, अहमदनगर महापालिका क्षेत्र नऊ व लष्करी रुग्णालयातील एकाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 76 हजार 817 झाली आहे.

