अ‍ॅमेझॉनची सेलर रजिस्ट्रेशन व अकाऊंट मॅनेजमेंट सेवा आता मराठीत

नायक वृत्तसेवा, नगर
विक्रेत्यांना आता ‘अ‍ॅमेझॉन डॉट. इन.’ बाजारपेठेमध्ये आपले नाव नोंदविण्याचे आणि आपला ऑनलाइन बिझनेस सांभाळण्याचे काम मराठीतून करता येईल अशी घोषणा अ‍ॅमेझॉनने नुकतीच केली आहे. मराठी भाषेच्या आगमनामुळे महाराष्ट्रातील लाखो भारतीय उद्योजक, एमएसएमई, स्थानिक दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांना भाषेचा अडथळा पार करत ई-कॉमर्सचा फायदा घेता येणार आहे. विक्रेता नोंदणी अर्थात सेलर रजिस्ट्रेशन आणि अकाउंट मॅनेजमेंट सेवा मराठीमध्ये उपलब्ध झाल्याने 85 हजारांहून अधिक विद्यमान अ‍ॅमेझॉन सेलर्स आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव यांसारख्या टियर-1 व त्याखालील श्रेणींमधील शहरांतील लाखो नव्या विक्रेत्यांना फायदा होणार आहे.

अ‍ॅमेझॉन परिवाराचा भाग होण्यासाठी एखाद्या विक्रेत्याला लागणार्‍या प्रत्येक गोष्टीचा या सुविधेमध्ये समावेश आहे. अ‍ॅमेझॉन विक्रेता म्हणून पहिल्यांदाच नाव नोंदणी करण्यापासून ते ऑर्डर्सचे व्यवस्थापन करण्यापर्यंत ते उपलब्ध मालाच्या सूचीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत आणि आपल्या कामगिरीच्या आकडेवारीचे मूल्यमापन करण्यापर्यंत सर्व सुविधा त्यांना आपल्या सोयीच्या भाषेमध्ये उपलब्ध होणार आहेत. हा अनुभव अ‍ॅमेझॉन सेलर वेबसाइट व मोबाइल अ‍ॅपवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याखेरीज अ‍ॅमेझॉनकडून सेलर सपोर्ट सेवा आणि सेलर यूनिव्हर्सिटी व्हिडिओज व ट्युटोरियल्स सुद्धा मराठीतून पुरवली जाणार आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या एमएसएमई अँड सेलर पार्टनर एक्स्पीरियन्स विभागाचे संचालक प्रणव भसीन म्हणाले, भारतीय एमएसएमईंना आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी ई-कॉमर्सचा फायदा घेताना जाणवणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भाषा. अधिकाधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना ई-कॉमर्सच्या क्षेत्रात येण्यासाठी सक्षम बनविताना आम्ही आमच्या स्थानिक भाषांतील, व्हॉइस आणि व्हिडिओजचे पाठबळ असलेल्या उपक्रमांना अधिक भक्कम बनविण्यासाठी बांधिल आहोत. आणि 2025 पर्यंत 1 कोटी एमएमएमईंना डिजिटाइझ करण्याच्या आमच्या प्रतिज्ञेबरहुकूम उचलले गेले असल्याचे सांगून अ‍ॅलेक्सा हिंदी सुरू झाल्याने आता ग्राहक अ‍ॅलेक्साशी फक्त इंग्रजीतूनच नव्हे तर हिंदी किंवा हिंग्लिशमधूनही संवाद साधू शकतात, प्रश्न विचारू शकतात असे शेवटी त्यांनी नमूद केले.

Visits: 93 Today: 1 Total: 1108337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *