पोखरकर नेत्रालयाचे रविवारी होणार उद्घाटन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या समृद्ध वैद्यकीय सेवेत नव्याने पोखरकर नेत्रालयची भर पडत आहे. रविवारी (ता.20) सकाळी साडेनऊ वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती पोखरकर परिवाराने दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेरची समृद्ध वैद्यकीय सेवा म्हणून ओळख आहे. यामध्ये नेत्रविकार रुग्णांसाठी पोखरकर नेत्रालयाने अद्ययावत व सोयी-सुविधांयुक्त सेवेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या रुग्णालयाचे रविवारी जुने तांबे हॉस्पिटल समोरील कीर्ती प्लाझा येथे महसूल मंत्री थोरातांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा दुर्गा तांबे उपस्थित राहणार आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, डॉ.डी.एल.शेळके, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक वायकर प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत. तरी या शुभारंभप्रसंगी हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.किशोर पोखरकर, आशा पोखरकर, डॉ.संतोष पोखरकर, डॉ.प्राजक्ता पोखरकर यांनी केले आहे.

Visits: 170 Today: 1 Total: 2170384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *