संगमनेर शहर एनएसयूआयच्या अध्यक्षपदी सय्यद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते हैदरअली सय्यद यांची नुकतीच संगमनेर शहर एनएसयूआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने विद्यार्थी वर्गामध्ये उत्साही वातावरण झाले आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गेल्या सहा वर्षांपासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एन. एस. यू. आय.च्या माध्यमातून काम करून पक्षाची ध्येयधोरणे जनमानसांत पोहोचवणे, संघटन करणे यांसारखे कामे करत असताना शहर सरचिटणीस, शहर उपाध्यक्ष ते शहराध्यक्ष अशी हैदरअली सय्यद यांची निवड झाली आहे. सदर निवड संगमनेर अमृत लॉन्स येथे युवक काँग्रेस व एनएसएसयूआयच्या आयोजित स्नेहमेळावा व नवीन पदाधिकारी निवडी प्रसंगी केली असून निवड पत्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते देण्यात आले. शकील पेंटर यांचेनंतर शहरातील संघटनात्मक राजकारणात सय्यद यांना शहराध्यक्षपदी संधी दिल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण आहे.

 

Visits: 92 Today: 3 Total: 1114012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *