कोल्हार-घोटी रस्त्याच्या कामासाठी अकोलेत आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या कोल्हार-घोटी राज्यमार्गाचे काम चालू आहे. परंतु, ठिकठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने तालुक्यातील इंदोरी येथील बत्तीसवर्षीय युवकाचा अपघात झाला. गेल्या महिनाभरापासून नाशिक व अहमदनगर येथे उपचार चालू असताना बुधवारी (ता.7) निधन झाले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.9) अकोलेत रास्ता रोको आंदोलन करत रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करुन जखमी व मृतांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

गेल्या महिनाभरापूर्वी इंदोरी येथील सागर नवले या तरुणाचा राज्यमार्गाच्या दुरावस्थेने अपघात झाला होता. त्याच्यावर नाशिक व अहमदनगर येथे उपचार करण्यात आले. परंतु, बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह तालुकावासियांनी शुक्रवारी अकोलेत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे व ठेकेदार प्रतिनिधीने येत्या महिनाभरात अकोले हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. आणि तहसील कार्यालयात जखमी व मृतांना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Visits: 16 Today: 1 Total: 115140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *