कोपरगावातील ‘जनता टाळेबंदी’ कायम राहील ः चंद्रे

कोपरगावातील ‘जनता टाळेबंदी’ कायम राहील ः चंद्रे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
महाराष्ट्रात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील लॉकडाऊन शासनाने 30 सप्टेंबरपर्यंत काही अटी-शर्थींच्या आधारे वाढविला आहे. तसे परिपत्रक देखील जाहीर केले आहे. यानुसार कोपरगाव शहरातील दुकाने सकाळी 9 ते 7 यावेळेत सुरू राहतील. मात्र पुढील आदेश येईपर्यंत शहरातील ‘जनता टाळेबंदी’ कायम राहील असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.


अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना (दुकाने) सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत प्रशासनाच्या सुरक्षित अंतराच्या नियमात सुरू राहतील असे आदेश काढले आहेत. त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरातील देखील सर्व आस्थापना सकाळी 9 ते 7 यावेळेत खुली राहतील. मात्र पुढील आदेश येईपर्यंत शहरातील ‘जनता टाळेबंदी’ कायम असेल असे तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.

Visits: 158 Today: 1 Total: 1418044

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *