पदाधिकारी-ग्रामस्थांत समन्वय ठेवून ‘स्मार्टग्राम’ करता येते ः वाकचौरे
पदाधिकारी-ग्रामस्थांत समन्वय ठेवून ‘स्मार्टग्राम’ करता येते ः वाकचौरे
नायक वृत्तसेवा, अकोले
एखाद्या अधिकार्याने ठरवलं तर पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात योग्य समन्वय ठेवून ‘स्मार्टग्राम’ करता येेते. ही किमया गणोरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांनी करुन दाखविली आहे, असे गौरवोद्गार भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे काढले.

14 व्या वित्त आयोगातून 74 हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या जलकुंभाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी चौधरी, पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे, सरपंच वंदना दातीर, उपसरपंच राजेंद्र आंबरे, सदस्य बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब दातीर, अनिल आहेर, रावसाहेब आहेर, संतोष आंबरे, मंगल दातीर, सुमन आहेर, अनिता आंबरे, चंद्रकला दातीर, वंदना शिंदे, सुमन आहेर आदी उपस्थित होते. विद्यमान सदस्यांची मुदत 10 सप्टेंबर रोजी संपणार आहे. गेल्या पाच वर्षांत सर्व सदस्यांनी गावासाठी खूप चांगलं योगदान दिल्याने गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावता आल्याची भावना ग्रामविकास अधिकारी ढाकणे यांनी व्यक्त केली. गणोरे गाव ‘स्मार्टग्राम’ म्हणून तालुक्यात ओळखले जाते. गावाने केलेल्या कामांचा लेखाजोखाही लघुपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला आहे. उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतचे आणि ग्रामविकास अधिकार्यांचे कौतुक करत यापुढेही गावाच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन केलं. अगस्ति कारखान्याचे संचालक सुनील दातीर, अंबादास दातीर, गणपत दातीर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संजय बोर्हाडे, रामदास आंबरे, दीपक काळे आदिंनी परिश्रम घेतले.

