बर्‍हाणपूर फाट्यावर ट्रकच्या धडकेत चार बैल ठार

नायक वृत्तसेवा, नेवासा
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील बर्‍हाणपूर फाट्यावर मालवाहतूक ट्रकने चार उसतोड कामगार जखमी झाले तर तीन बैल जागीच ठार झाले. सदर अपघात शनिवारी (ता.20) पहाटे साडेचार वाजता झाला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुळा साखर कारखान्याच्या दोन बैलगाड्या व कामगार उसतोडणीसाठी शनिवारी पहाटे जात होते. नगरहून औरंगाबादकडे जात असलेल्या भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने (क्र.एमएच.16, एवाय.9581) बैलगाड्यांस जोराची धडक दिली. यामध्ये तीन बैल जागीच ठार तर एक जखमी झाला आहे. तसेच लक्ष्मण बर्डे, अकबर शेख, सुरेश घोंगडे व दादासाहेब पालवे हे चार उसतोड कामगार जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मुळा कारखान्याचे सुरक्षा अधिकारी प्रवीण चौधरी व कर्मचार्‍यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या दोघा जखमींवर अहमदनगर तर दोघांवर सोनईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उसतोड कामगारांचे बैल ठार झाल्याने त्यांचा प्रपंच उघड्यावर आला आहे.

Visits: 182 Today: 1 Total: 1916882

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *