महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलेला मातृत्व देण्यात यश! संगमनेरातील वाणी डॉक्टर दाम्पत्याचे होतेय सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेले वाणी हॉस्पिटल अनेक महिलांना मातृत्व देण्यात यशस्वी ठरल्याने नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. अनेक प्रयत्न करुनही गर्भधारणा अयशस्वी होत असलेल्या महिलेला जेव्हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी मिळते तेव्हा मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर आपणही एका महिलेला मातृत्व दिल्याचा सुखद क्षण काम करण्यासाठी अधिक ऊर्जा देणारा असल्याची भावना वाणी डॉक्टर दाम्पत्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात वाणी हॉस्पिटलमध्ये अर्चना सोमनाथ तळोले (रा.लोणी) यांची यशस्वी प्रसूती झाली. लग्नाच्या 4 वर्षांपासून गर्भ राहत नव्हता. तीनवेळा आययूआय पद्धतीने व दोनवेळा आयव्हीएफ करूनही सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा अगदी विश्वासाने हे जोडपे वाणी हॉस्पिटलमध्ये आले. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान-उपचार व पुरुष-स्त्री उत्तर बस्ती याची सांगड घालून उपचार करणार असल्याची माहिती दिली. त्यांनी देखील याला होकार दर्शविला. त्यानंतर उपचार सुरू झाले आणि यश मिळण्यास सुरुवात झाली.

दोन महिन्यात गर्भधारणा राहिल्याने सर्वजण आनंदी झाले. दिवसामागून दिवस जाऊन मागील आठवड्यात गोंडस मुलाचा जन्म झाला. त्यावेळी सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही सुखद घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडल्याने वाणी डॉक्टर दाम्पत्यालाही सेवाव्रत करताना यश मिळाल्याचा सुखद अनुभव मिळाला. तर तळोले दाम्पत्यानी वाणी डॉक्टर आमच्यासाठी देवदूतच ठरल्याची प्रतिक्रिया दिली.

मातृत्व मिळत नसेल तर निराश होऊ नका. नियती, प्रकृती व वैद्याचे प्रयत्न व स्वतःवर श्रद्धा आणि सबुरी ठेवा. यापद्धतीने उपचार केल्यास नक्कीच मातृत्व मिळू शकते. विशेष म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे घडल्याने मनस्वी आनंद झाला.
– डॉ. श्रद्धा प्रतीक वाणी (स्त्री रोगतज्ज्ञ वाणी हॉस्पिटल, संगमनेर)
